Marathi Bhasha Sanvardhan Pandhrawada
मराठवाडा मित्र मंडळ संगणक विभाग च्या वतीने दि २४/०१/२०२२ रोजी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा च्या निमित्ताने ‘, ‘लेखक कवी आपल्या भेटीला ह्या सत्रा अंतर्गत ‘कवी श्री हनुमंत चांदगुडे ‘ह्यांना आमंत्रित केले होते . कार्यक्रमाची वेळ दुपारी १२ वाजून १५ मिनिट होती.
ह्या कार्यक्रमात प्रा शाहीन मुलानी ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोल्हार सर ह्यांनी मनोगत व्यक्त केले . संगणक विभाग प्रमुख डॉ संदीप अनपट ह्यांनी कार्यक्रमाबद्दल आपला अभिप्राय व्यक्त केला. ह्या कार्यक्रमासाठी १०० विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होती. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन आणि समारोप प्रा. शुभांगी मठे ह्यांनी केले.
माननीय पाहुण्यांनी मराठी भाषेची विविध पैलू उलगडून दाखवले . मराठी भाषा कशी सुसंस्कृत आणि प्रभावशाली आहे ह्याची अनेक उदाहरणे देऊन सर्वाना मंत्र मुग्ध केले . विद्यार्त्यांसोबत सुसंवाद साधून , प्रत्येक माणूस हा कवी होऊ शकतो ह्याचा आत्मविश्वास निर्माण केला.