Marathi Bhasha Gaurav Din

Thursday, 04 March 2021 10:33

Marathi Bhasha Gaurav Din

 "मराठी भाषा गौरव दिन २०२१- अहवाल " 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास मंडळांतर्गत "मराठी भाषा गौरव दिन" २७ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरा केला गेला.

ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दिनांक २७ फेब्रुवारी हा " मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीपत्रक संदर्भ : विविमं /२०२०-२१/२५७ अन्वये महाविद्यालयात विविध उपक्रम /कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. यामध्ये कथाकथन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, पुस्तक परिचय, मराठी म्हणी व त्यांचा अर्थ, प्रश्नमंजुषा स्पर्धा इ. चे  आयोजन करण्यात आले.

विविध कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमांना शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. वरील सर्व कार्यक्रमांमध्ये जवळपास १५ हुन अधिक  शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सह्भाग घेतला. कार्यक्रमादरम्यान मराठी भाषेच्या प्रसारासाठी साहित्यवेदी या संकेतस्थळाच्या माध्यमातून मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. सुजाता शेणई यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. देविदास गोल्हर यांच्या हस्ते  केला गेला.

प्रमुख अतिथी  डॉ. सुजाता शेणई यांनी 'मराठी भाषा व साहित्य' या विषयावर संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा. प्रवीण कड यांनी केले व डॉ. अश्विनी पारखी यांनी उपथित सर्वांचे  आभार मानले.

    अशा प्रकारे मराठी भाषा गौरव दिन २०२१ अंतर्गत शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी एक आगळा वेगळा अनुभव घेतला. महाविद्यालयाने मराठी भाषा गौरव दिन २०२१ मोठ्या उत्साहाने साजरा केला. या आयोजनाबाबत कोविडच्या पार्शवभूमीवर शासन निर्गमित सर्व सूचनांचे , प्रतिबंधक उपायांचे तंतोतंत पालन करण्यात आले.